Friday, February 5, 2010

PostHeaderIcon राहुल गांधींचा मुंबई दौरा...

खरच इतक महत्व आहे/ होत का हो या दौऱ्याला.. ?

कालच्या दौर्यातील एकाच गोष्ट मनाला भावली ..ती म्हणजे सुरक्षा व्यवस्था..
तब्बल २१,५०० पोलिसांचा फौज फाटा.. .. अहो किती हा ताण त्या पोलिसांना.. खरच सलाम त्या सर्व पोलिसांना.. great .
पण अशीच सुरक्षा व्यवस्था रोज असेल तर काय कुणाची हिम्मत मुंबई वर हल्ला करण्याचा विचार ही करयची ...

राहुल गांधींचा मुंबई दौरा, एक धावती भेट... पण त्या भेटीला मोठ केल ते मेडिया ने. खर तर ठाकरे कुटुंबातील कोणी त्यांना अडवू.. पाय ठेऊन देणार नाही... अस कोणीच बोलाल नव्हत ...
तरीही हा सामना राहुल ने जिंकला... या मथळ्याखाली ब्रेअकिंग news चालूच... अन रात्री ही तेच.. उलट बाकीच्या नेत्यांना उलटे प्रश्न कि तुमचे नेते फिरतात का असे..
अहो राहुल काही रोज रोज LOCAL मधून फिरत नाही.. फक्त १ दिवसाच्या show - off च्या मागे धावू नका.. मला कोणी सांगेल का कि राहुल ने कोणती कोणती विधायक काम केलीत ते... ?

राहुल एक चांगला नेता असेल ही.. त्याबद्दल वाद नाही..
पण एक लाजिरवाणी गोष्ट वाटली ती म्हणजे... आपल्या महाराष्टाच्या मंत्रांनी केलेलं लांगुल चालण..

अहो मुख्यमंत्य्रांची भेट मिळणे म्हणजे दुरापास्त असते.. १-१ क्षण किती लाख मोलाचा.. त्या प्रत्येक क्षणात लाखोंच्या भवितव्याला वेगळे वळण मिळणार असते..
पण ते ही काल राहुल ची तब्बल ३ तास वात पाहत बसले होते..

त्यावर कडी केली ते आमचे गृह राज्यमंत्री.. अहोप तुम्ही या स्वाभिमानी राज्याचे गृह राज्यमंत्री आहात.. गांधींच पाळलेल ताटाखालचं मांजर नव्हे....
खर तर तुम्ही पुण्याचे म्हणून थोडा अभिमान वाटत होता.. पण .... अहो काय गरज होती इतक लांगुल चालण करण्याची.. आपण जनतेचे सेवक आहोत.. जनतेची सेवा करा... गांधींचे जोडे उचलण्यात क्रोंग्रेस च्या नेत्यांची हयात गेली..
बदला तो इतिहास ...
इतिहास असतो तो त्यातून शिकण्यासाठी, सुधारण्यासाठी .. परत Repeat करण्यासाठी नव्हे..


मला बाकी काही नाही कळत ..अन मी इतका मोठा ही नाही...
मला कळतो तो फक्त स्वाभिमान..
भारतीय संसदेत ही ज्यांची प्रतिमा सर्वात पहिली लावली जाते त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा बाणा .... कणखरपणा.
मला कळते तो पु . ल. चा , आचार्य अत्रेंचा, लोकमान्य टिळकांचा मुद्देसुर्पणा, बड्या बड्या धेन्दना त्यांनी नमवले आहे.. पण ते कधी स्वत कुणापुढे नमले नाहीत..
आम्हाला खूप लहान पानापासून एक बिंबवल गेल..
" जगाव तर शिवाजी राजांसारख, अन मारावे तर शंभू राज्यांसारखं॥ "
कमीत कमी तुम्ही राजांची तरी लाज राखा हो..
हा ... महाराष्ट्र.. आहे महाराष्ट्र....

मला एक काळात नाही. तुम्ही आपल्या नव्या पिढीला काय आदर्श देत आहात.. ?
३ री -४ थी च्या वर्गात अजूनही परीक्षेत प्रश्न असतात.. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण... गृह राज्यमंत्री कोण..
आता तुमची नाव त्यांना काळी अन तुमचे हे असे गाडलेले झेंडे जर त्यांना दिसले तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल...
तुमच असाल लांगुल चालण करणार अनुकर त्यांनी कराव असे का वाटते तुम्हाला?
हो मग जर त्यांनी जाऊन दुसर्या कुणाचे जोडे उचलले तर त्यांना रागाऊ तरी नाक .. म्हणजे मिळवलं...

अजून मी तर राहुल गांधींवर काही बोललोच नाही...
अन तूर्तास मला त्या वादात ही पडायचं नाही.. फक्त उगीच बाहेर राहून अशी वक्तव्य करू नका कि ज्यामुळे रण पेटेल.. कारण त्याची झळ तुम्हाला पोहोचताच नाही हो..
महागाई सारखे इतके मोठे प्रश्न असताना फक्त बिहारच्या निवडणुका आहेत म्हणून त्यांना खुश करण्यासाठी काहीही वक्तव्य करून इकडे महाराष्ट्र पेटवू नका...

शब्दांकन - किरण जगताप

Followers